Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना खते उपलब्ध करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करणार - चेतनसिंह केदार-सावंत

शेतकऱ्यांना खते उपलब्ध करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करणार - चेतनसिंह केदार-सावंत


जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन संपन्न
सांगोला दि.२८(क.वृ.): शेताच्या बांधावर खते देण्याची राज्य शासनाची घोषणा फसवी असून बांधावर दूरच दुकानात देखील खत मिळत नसल्याची परिस्थिती आहे. शासनाने शेतकऱ्यांची अडवणूक न करता मुबलक प्रमाणात युरियासह इतर खते तातडीने उपलब्ध करावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, शहराध्यक्ष आनंद फाटे, अभिजित नलवडे,  विजय बाबर, सूर्याजी खटकाळे, दत्ता टापरे,
राजू शिंदे, लक्ष्मीकांत लिगाडे, श्रीकांत पाटील, मानस कमलापूरकर, माणिक सकट, संजय गंभीरे, संग्राम गायकवाड, प्रसाद फुले, शिवाजी ठोकळे, दीपक केदार, बिरा मेटकरी, अजय रूपटक्के, विजयकुमार इंगवले, उमेश मंडले, बापू चव्हाण, बंडू चव्हाण, शंभू माने, दत्ता चव्हाण, तुकाराम चव्हाण आदी उपस्थित होते.
खतांसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने बळीराजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगोल्यात भाजपच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार योगेश खरमाटे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यंदा पावसामुळे खरीप हंगामात पेरण्या चांगल्या झाल्या असून सध्या पिकांची वाढ होण्यासाठी युरिया खतांची आवश्यकता असताना शेतकऱ्यांना खतांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने खत दुकानदार शेतकऱ्यांची अडवणूक करून जादा दराने खतांची विक्री करत आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला न्याय देण्यासाठी प्रशासनाने युरियासह इतर खते, कीटकनाशके मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत असे त्यांनी सांगितले. 
युरियाची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रांगेत उभे राहुन खत खरेदी करावे लागत आहे. खत दुकानदार युरियासह इतर खते खरेदी करण्याची सक्ती करत आहेत. शासनाने शेतकऱ्यांची अडवणूक न करता खते उपलब्ध करावीत. तसेच युरियाचा काळाबाजार करणाऱ्या खत दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. येत्या दोन दिवसांत तालुक्यात खतपुरवठा सुरळित झाला नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिला आहे.
सदर आंदोलनस्थळी तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत तात्काळ खत उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. सांगोल्यासाठी ४०५६ मेट्रिक टन आवंटन प्राप्त झाले होते. त्यापैकी ३३५० मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. दोन दिवसात खतांचा सुरळीत पुरवठा करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments