कार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2020

कार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान

                    कार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि                                           जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान

तुळजापूर -उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाला दवाखान्यात दाखल करून जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे  यांनी कारचा ताबा घेतला आणि दोन किलेामीटर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोहोचल्या.
जिल्ह्यातील काही खासगी दवाखाने कोरोना रुग्णांना उपचार देण्यास असमर्थता दर्शवत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुधोळ-मंुंडे यांनी अशा दवाखान्यांना कारवाईसंदर्भात नेाटिसा बजावून अचानक भेटी देऊन कारवाईचाही इशारा दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत संलग्न काही खासगी दवाखान्यांना सोमवारी जिल्हाधिकारी यांनी भेटी दिल्या. त्या सह्याद्री हॉस्पिटल तसेच सुविधा हॉस्पिटलमध्ये गेल्या. सुविधा हॉस्पिटलमध्ये भेट दिल्यानंतर गाडीत बसून कार्यालयाकडे जाताना त्यांच्या कारचे चालक जवळगे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याला सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांनी स्वत: कार चालवत दोन किलेामीटर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोहोचल्या.. जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांच्या प्रसंगावधानाबद्दल आणि कार्यतत्परतेबद्दल कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages