उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे 65 लाख रुपयाचा दंड वसूल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2020

उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे 65 लाख रुपयाचा दंड वसूल

उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडूनसुमारे  65 लाख रुपयाचा दंड वसूल



सोलापूर, दि.१६(क.वृ.): कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे  65 लाख 11 हजार 80 रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. 6 ते 16 जुलै 2020 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकी वरुन दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास,  निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी 28827 प्रकरणात 48 लाख 39  हजार 350 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 9025 प्रकरणात 12 लाख 56 हजार 450 रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 3120 प्रकरणात 4 लाख 15 हजार 280 रुपयांचा दंड वसूल केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages