जिल्ह्यात पाच हजार अँटिजेन टेस्ट करणारजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
सोलापूर, दि.१६(क.वृ.): जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या दहा दिवसात पाच हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यात 861 अँटिजेन टेस्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील अँटिजेन टेस्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या टेस्टमुळे अर्ध्या तासातच कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती कळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात येत्या दहा दिवसात अँटिजेन टेस्टची व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
आजपर्यंत अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर येथे या तालुक्यातून टेस्टची सुरुवात करण्यात आली आहे. अँटिजेन टेस्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना बाधा झालेल्या व्यक्तीचे झटपट अलगीकरण करणे, त्यांच्यावर उपचाराची सुरुवात करणे शक्य झाले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 861 अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे: अक्कलकोट-90, बार्शी-257, माळशिरस-32, पंढरपूर -161, उत्तर सोलापूर-87,दक्षिण सोलापूर-234.
0 Comments