रेमडेसिवीर, टॉसिलिझुमाब, आयटोलिझुमाब इंजेक्शन सोलापूरमध्ये उपलब्ध
सोलापूर, दि.१६(क.वृ.) : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र कोरोनाबाधित रूग्णांसाठी रेमडेसिवीर, टॉसिलिझुमाब आणि आयटोलिझुमाब ही इंजेक्शन सोलापूर शहरासह बार्शी येथे उपलब्ध आहेत. नागरिकांनी या इंजेक्शनचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
इंजेक्शन उपलब्ध असणारी मेडिकल स्टोअर्स आणि संपर्क नंबर्स खालीलप्रमाणे:
सोलापुरात बलदवा इंटरप्रायजेस (संपर्क-0217-2624074, 9822072130), अश्विनी औषध भांडार (0217-2319900, 9689540365), सीएनएस मेडिकल (8888843673), हुमा फार्मा आणि सर्जिकल्स (9960445558), केशवाह फार्मसी (9765999855, 9049998919), श्री मार्कंडेय औषधी भांडार (0217-2721320, 9822441381), यशोधरा फार्मसी (0217-2323001, 8888049390) आणि श्री महालक्ष्मी मेडिकल, बार्शी (02184-224003, 9420754003)
0 Comments