चेंबर ऑफ कॉमर्सचा संचारबंदीला पाठिंबा
सोलापूर, दि.१६(क.वृ.): कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीला (लॉकडाऊन) सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर संघटनेने पाठिंबा दिला असल्याचे अध्यक्ष राजू राठी व मानद सचिव धवल शहा यांनी जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.
श्री. राठी व शहा यांनी पाठिंब्याचे पत्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे. लॉकडाऊनसंदर्भात जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी विविध राजकीय, सामाजिक संघटना, संस्था यांच्या बैठका घेतल्या होत्या. या बैठकांना चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यानुसार चेंबर ऑफ कॉमर्स प्रशासनाला मदत करणार आहे, असे नमूद निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनासोबतच्या बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव धवल शहा, खजिनदार निलेश पाटील, पेंटप्पा गड्डम, संजय कंदले, सुकुमार चंकेश्वरा, प्रकाश मलजी, मल्लिकार्जुन कमटम, हुसेन बिराजदार, शांतीकुमार दोशी, चेतन बाफना, तुषार पटेल, राकेश कटारे, प्रितेश शहा, मकरंद गवळी, राजू कोचर आदी उपस्थित होते, असे श्री. राठी यांनी नमूद केले आहे.
0 Comments