Hot Posts

6/recent/ticker-posts

अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन



सोलापूर, दि.१६(क.वृ.) : सोलापूर जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आस्थापना, उद्योग धंदे, व्यापार, स्वयंरोजगार त्यांच्या सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती ई-मेलद्वारे/हस्तदेय सादर करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.  
जिल्ह्यातील विविध क्षेत्रात असलेल्या रोजगाराची माहिती शासनास होण्यासाठी तसेच नवीन योजना राबविण्यासाठी व इतर कामकाजासाठी त्या माहितीचा उपयोग होणार असल्याने जिल्ह्यातील कार्यालयाची/ आस्थापनांची माहिती सादर करण्यात यावी. याबाबत अधिक माहितीसाठी 0217-2622113/2722116 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments