सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेत यश
![]() |
ऋषिकेश माळी 87.6 टक्के (प्रथम क्रमांक) |
![]() |
प्रसन्न कंटीकर 79.4 टक्के (तृतीय क्रमांक) |
![]() |
राहुल नवले 76.2 टक्के (पाचवा क्रमांक) |
सांगोला दि.१६(क.वृ.): सांगोला परिसरातील एक आघाडीची दर्जेदार शाळा, अशी ओळख असलेल्या 'सिंहगड पब्लिक स्कूल’मधील विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावी बोर्डामध्ये चमकदार यश मिळविलेआहे.
सांगोला परिसरात कमलापूर येथे ‘सिंहगड पब्लिक स्कूल ’ ही सीबीएसई शाळा गेल्या 12 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरत आहे. बारावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असलेली ही शाळा नवी दिल्ली बोर्डाला संलग्न आहे . या परीक्षेत शाळेचा विद्यार्थी ऋषिकेश माळी यांनी 87.6 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला सोहम गुळमिरे 81.2 टक्के द्वितीय, प्रसन्न कंटीकर 79.4 टक्के तृतीय ,काजल केदार ही विद्यार्थिनी 76.6 टक्के चतुर्थ तर राहुल नवले 76.2 पाचवा क्रमांक मिळवला.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कॅम्पस डायरेक्टर श्री अशोक नवले व शाळेच्या प्राचार्य समीरा फर्नांडिस यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments