मुंबई (वृ.से.):- सध्याच्या कोरोनामुळे असलेल्या वातावरणामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे सर्वांची मनस्थिती नकारात्मक झाली आहे.यातच आता एक दिलासादायक बातमी आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी एक गुड न्यूज आहे. बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी 'व्हिडिओ KYC' ची सुरुवात केली आहे. या सेवेला 'व्हीकेवायसी' नावं देण्यात आलं आहेत..
याद्वारे घरी बसून डिजिटल पद्धतीने केवायसी प्रक्रिया करता येईल. तुम्हाला यासाठी बँकेत येण्याची गरज नाही. 'एसबीआय कार्ड'ने ही सेवा सुरू केली आहे. 'एसबीआय कार्ड' ही क्रेडिट कार्ड जारी करणारी देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक कंपनीच्या रुपात काम करते.
VKYC मुळे फसवणूक रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, तसेच केवायसी प्रक्रियेसाठी लागणारा वेळही निम्मा होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं. याद्वारे कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटता केवायसी प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येईल. व्हिडिओ केवायसीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, जिओ टॅगिंग, रिकग्निशन, डायनॅमिक व्हेरिफिकेशन कोड, लाइव्ह फोटो कॅप्चर फेशियल रिकग्निशन यासारख्या टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकांना झीरो कॉन्टॅक्ट आणि कुठल्याही अडचणी शिवाय बँक फॅसिलिटी देता यावी हा प्रयत्न असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
0 Comments