कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी मास्टरप्लान तयार करा- आ. शिंदे
सोलापूर(क.वृ.):- शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून कोव्हिड 19 रुग्णांची संख्या वाढत आहे. या रोगामुळे रुग्णांचा मृत्युही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याची कारणमिमांसा करण्यासाठी व वाढत असलेला मृत्युदर कसा कमी करता येईल याबाबत आ. प्रणिती शिंंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोमपा आयुक्त पी. शिवशंकर तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय ठाकूर यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीमध्ये सद्या कोरोनामुळे शहरामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचे अवलोकन करून, गंभीर कोरोना रुग्णांची तब्यतीत सुधारणा होण्यासाठी (Tocilizumab) टोसिलिझुम्याब इंजेक्शनची आवश्यकता असते. परंतू या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ताबडतोब शासनाकडे ह्या इंजेक्शनची पुर्तता करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याबद्दल आ. शिंदे यांनी फोन करून वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालक तात्याराव लहाने यांना सोलापूरातील परिस्थितीची माहिती देवून ताबडतोब (Tocilizumab) टोसिलिझुम्याब इंजेक्शनची पुर्तता करण्याची मागणी केली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता लागणारे व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन तसेच हायफ्लो नसल कॅम्युला ह्या मशीनची मागणी करण्यात आली आहे. सदर मशीन एक-दोन दिवसांमध्ये सोलापूर येथे उपलब्ध होतील. तसेच काल आ. प्रणिती शिंदे यांनी स्वत:चे वाहन पाठवून मुंबई येथून श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय येथे (Tocilizumab) टोसिलिझुम्याब इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे.
सोलापूर शहरातील विविध आजार असणारया रुग्णांची एक्सरे मशीनव्दारे त्यांच्या फुफ्फुसाची तपासणी करून जर त्यावर निमोनियाचे पॅचेस आढळून आल्यास तसेच त्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल कमी असल्यास त्यांना ताबडतोब अॅडमिट करून त्यांची कोरोना तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात येणार आहेत.
0 Comments