कृषी पदवीधर संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी अभिजीत कांबळे
सांगोला(प्रतिनिधी) कृषी पदवीधर संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी महुद बु!! ता.सांगोला येथील मा.अभिजीत महादेव कांबळे यांची निवड झाली आहे.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण मा.महेश कडूस-पाटील यांनी अभिजीत कांबळे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
कृषी पदवीधर संघटना ही 2012 साली स्थापन झाली असून महाराष्ट्रातील कृषी व संलग्न पदवीधर बांधवांसाठी काम करणारी संघटना आहे.गेली आठ वर्षे या संघटनेकडून अनेकविध आंदोलने,मोर्चे व जनजागृतीच्या माध्यमातून कित्येक कृषी पदवीधर व शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे.यावेळी संपूर्ण कृषी पदवीधर संघटनेत कार्यशैलीमुळे अभिजीत कांबळे यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांची सर्वानुमते जी निवड झाली याचा मला मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन महेश कडूस-पाटील यांनी केले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण महेश कडूस-पाटील,उपाध्यक्ष डॉ.चित्तरंजन भांदुर्गे,युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा.सुरज खोमणे-पाटील,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.गणेश बाबर व कोअर कमिटी यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक कृषी पदवीधर व शेतकरी बांधवांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊन संघटना वाढीसाठी कार्य करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी सांगितले.निवडीनंतर विविध स्तरातून अभिजीत कांबळे यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments