चांगुणाई सोशल फाऊंडेशन कुर्डुवाडी कडून रक्तदान शिबिर
कुर्डुवाडी(प्रतिनिधी):जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक होत असताना राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.राज्य सरकारने नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले आहे.याच आवाहनाला साथ देत चांगुणाई सोशल फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.महालक्ष्मी कापड दुकान येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचे उद्घाटन कुर्डुवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष आनुपशेठ कदम, दिनेश बोबडे, आकाश कांबळे, गणेश शेजाळ, सुशिल शिंदे, ईश्वर राऊत, पप्पू व्यवहारे, सचिन गायकवाड,कुणाल जगतात,सुरज कांबळे,रमेश सरवदे आदी उपस्थित होते.
0 Comments