Ads

Ads Area

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि आबांच्या सामाजिक कार्याचा मला सार्थ अभिमान : सौ. रुपमतीताई दिपकआबा साळुंखे पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि आबांच्या सामाजिक कार्याचा मला सार्थ अभिमान : सौ. रुपमतीताई दिपकआबा साळुंखे पाटील 

जवळा व परिसरातील 3 हजार कुटुंबातील 10 हजार नागरीकांना मोफत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषध गोळ्या वाटपाचा शुभारंभ संपन्न




सांगोला प्रतिनिधी :  कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जवळा गाव व परिसरात वेळोवेळी नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिमिटर द्वारे तपासणी करून गावामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करित, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक किटचे वाटप केले. तसेच या महामारी मध्ये देशाला रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, रक्तदान शिबिराचे आयोजन केले. आणि आज नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी म्हणून मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्सोनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले. गाव तालुक्यातील नागरिक ज्या ज्या वेळी अडचणीत सापडले त्या त्या वेळी प्रामाणिकपणे मदतीची भूमिका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व साळुंखे-पाटील कुटुंबियांनी बजावली आहे. गाव व परिसर कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यामागे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि साळुंखे-पाटील कुटुंबीयांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत, राजकारण समाजकारण याच्या पलीकडे जाऊन मानवता हाच एक धर्म म्हणून दिपकआबा यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे म्हणून मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि आबांच्या सामाजिक कार्याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन सौ. रुपमतीताई दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर गावात विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा सामाजिक उपक्रम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून व मा.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती विठ्ठल रसाळ यांच्या कूटुंबियांकडून सांगोला तालुक्यातील जवळा येथील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधांचे 3 हजार कुटुंबातील 10 हजार लोकांना मोफत गोळ्या वाटपाचा शुभारंभ काल रविवार दि. 7 जून रोजी जवळा तालुका सांगोला येथे पार पडला. यावेळी उद्योगपती रसाळ यांच्या समाजकार्याचे कौतुक करीत, कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष म्हणून सौ. रुपमतीताई दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टंसिंग या नियमाचे पालन करण्यात आले होते. यावेळी जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अलकाताई घुले, मानाजीराव घुले, उपसरपंच बाबा इमडे, जवळा विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विजयकुमार देशमुख, जवळा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आणि इलेव्हन स्टार क्लब यांचे सर्व मेंबर्स उपस्थित होते.
यावेळी रुपमतीताई साळुंखे पाटील यांनी अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या कशा घ्याव्यात आणि त्याचे आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती कशी वाढते, त्याविषयी माहिती सांगत, देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि गोरगरीब व गरजूंना मदत करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. यामध्ये प्राधान्य पवार साहेबांच्या विचाराने मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील गोरगरीब व गरजू जनतेसाठी एक कोटी रुपयांचे 10 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे वाटप केले, गावामध्ये सॅनिटायझर फवारणी केली, थर्मल स्क्रिनिंगचा मशीन आणून तालुक्यातील नागरिकांचे टेम्परेचर चेक केले, आणि आता हे जवळा गावातील संपूर्ण दहा हजार नागरिकांसाठी प्रकाश रसाळ कुटुंबियांकडून अर्सेनिक अल्बम तीस गोळ्यांचे वाटप केले जात आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे सांगितले. तसेच हा डोस प्रतिव्यक्तीस अंदाजे पन्नास रुपये खर्च येतो तर दहा हजार नागरिकांकरिता अंदाजे साडेचार ते पाच लाख रुपये यांचा खर्च हा रसाळ कुटुंबियांनी केलेला आहे.रसाळ कुटुंबीयांचा गावचा स्नेह आणि प्रेम कायम राहू दे असा आशावाद त्यांनी वर्तवित त्यांच्या कार्यास मनपूर्वक शुभेच्या दिल्या. त्याचबरोबर गाव आणि परिसरावर येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी साळुंखे-पाटील कुटुंबीय प्रत्येक नागरिकांच्या सदैव पाठीशी असेल असा विश्वासही सौ. साळुंखे पाटील यांनी दिला. 
जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी आशा वर्कर,महिला बचत गटातील महिला, अंगणवाडीतील शिक्षिका यांनी जेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेव्हापासून या कोरोना योध्दांनी आपल्या जीवाची परवा न करता जनसेवा केली आहे. त्यांच्या या कार्याचे जयमालाताईनी खूप कौतुक केले. अशा वर्कर्सने आणि अंगणवाडी सेविका यांनी आर्सेनिक गोळ्यांचे वाटप कसे करावे त्या गोळ्या कशा घ्यावेत याचेही मार्गदर्शन केले. तसेच कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील, ह. भ. प. शारदादेवी साळुंखे-पाटील यांनी दिलेल्या शिकवणीतून समाजकार्याचा वारसा आम्ही भाऊ -बहीण जोपासण्याचा प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, रूपालीताई चाकणकर व पाणीदार आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा गाव व परिसरातच नव्हे तर सांगोला तालुका आणि संबंध जिल्ह्याभरात नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्राधान्यक्रमाने पुढे असेल असा विश्वासही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या, मा. अध्यक्ष जयमाला ताई गायकवाड यांनी दिला.
जवळा वि.का. सेवा सोसायटी, आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना घरपोहच आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषध गोळ्या वाटप करण्याची प्रक्रिया काल रविवारी सुरू करण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रेरणेतून उद्योगपती रसाळ कुटुंबीयांनी 5 ते 6 लाख रुपयांच्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषध गोळ्या जवळे गावात वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close