दारु दुकाने उघडण्याची परवानगी द्या- क्षीरसागर
सोलापूर(क.वृ.)ः- कोरोना सारख्या महामारीमुळे संपूर्ण जग थाबंले आहे. म्हणून जिल्ह्यातील देशी व विदेशी दारुची दुकाने बंद आहेत. ती आता सुरु करण्याची परवानगी द्यावी आशा अशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सोमोश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्र शासनाचे आदेश अनलॉक १ व राज्य शासनाचे बिंगीन अगेन १ या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापने चालू करण्याचे आदेश आपण दिले आहेत. या आदेशानुसार आपल्या जिल्ह्यातील महानगरपालिका व ग्रामीण भागातील क्षेत्रातील सर्व व्यवस्थापने आपण टप्याटप्याने चालू केले आहेत. या सर्व व्यवस्थापनाप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील देशी विदेशी मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या या वरील आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील परिस्थितीला अनुसरुन कोव्हीड-१९च्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करुन व तशी नियमावली करुन आम्हाला आमच्या सर्व देशी व विदेशी मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या चालू करण्यास परवानगी द्यावी.
या सर्व अनुज्ञप्त्याची सन २०२०-२१ ची चालू शासन आदेशाप्रमाणे नुतनीकरण शुल्क भरलेले आहे. तरी सदर अनुज्ञप्त्या बंद असल्या कारणाने आमच्या व आमच्या दुकानातील कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच या सर्व अनुज्ञप्त्यातील नोकरांना मागील दोन महिन्याचे वेतन आम्ही सर्व अनुज्ञप्ती धारकांनी आपल्या आदेशाने दिले आहे. सद्यस्थितीला चालू महिन्यामध्ये आमच्या अनुज्ञप्त्या चालू झाल्या नाही तर आम्ही आमच्या नोकरांना वेतन देऊ शकणार नाही, आमच्या सर्व जिल्ह्यातील अनुज्ञप्तीमधील नोकराची संख्या १५००० ते २०००० इतकी आहे व यांच्यावर अवलंबून असणार्यांचे संपूर्ण कुटूंब अशी मिळून त्यांची संख्या जास्त आहे. तरी या सर्व लोकांवरती उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. तरी आपण या गोष्टीचा गांभीर्यपुर्वक विचार करावा. तसेच आजमितीला आमचे अनुज्ञप्तीवर लॉकडाऊन काळामध्ये बँकेचे कर्जाचे. हप्ते व व्याज येथून पुढच्या काळात जर आमच्या अनुज्ञप्या चालू झाल्या नाहीत तर बँकेचे कर्जाचे हप्ते व व्याज आम्हाला भरणे शक्य नाही. वॉईन शॉप (एफ.एल.२), बीअर शॉपी (एफ.एल.बीअर-२), देशी दारु किरकोळ विक्री दुकान (सी.एल.३ बीअर-२) यामधील बीअरचे मद्य साठा हा फेब्रुवारी २०२० मध्ये आमच्या अनुज्ञप्तीमध्ये आलेला आहे. तरी तो आजमितीला पिण्याची मुदत (एक्सपाईर) संपण्याच्या मार्गावर आहे. तरी आजमितीला सदर अनुज्ञप्त्या चालू झाल्या नाही तर सदर बीअरचा मद्य साठा नष्ट करावा लागेल व त्याचे आर्थीक नुकसान आम्हाला सहन करावे, लागेल व बीअर मद्याचे एफ.एल:१ या होलसेल ठोक विक्रेते यांना आम्हाला रक्कम देणे अवघड जाईल व सदर सोलापूर जिल्ह्यामध्ये अंदाजे सर्व आमच्या अनुज्ञप्त्यामध्ये ५ ते ६. कोटी रुपयाची बीअर मद्य शिल्लक आहे, सदर वरील सर्व अनुज्ञप्तीमधील मद्याच्या साठयाचे पैसे हे आम्हाला एफ.एल.१, विदेशी टोक विक्रेते व सी.एल.२ देशी दारु ठोक विक्रेते या दोघा अनुज्ञप्त्यांचे मालाचे पैसे देणे हे अंदाजे २० ते २५ कोटी रुपये आहे. तरी हे ठोक विक्रेते वारंवार पैशासाठी आम्हाला तगादा करत आहे, त्यामुळे आम्ही मानसिक तानतणावाखाली वावरत आहोत. यामुळे आमच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.तसेच राज्य शासनाने इतर जिल्ह्यामध्ये परमीट रुम बीअर बार परवाना कक्ष, (एफ.एल.३) या घटकाला अनुज्ञप्तीच्या शिल्लक साठयाची बंद बाटलीतून विक्रीची परवानगी दिली आहे. जर आपण चालू महिन्यामध्ये आम्हास सर्व अनुज्ञप्तीमधून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याप्रमाणे विक्रीस परवानगी दिली तर या विक्रीतून आम्ही आमच्या नोकरांच्या पगारी, ठोक विक्रेतेच्या देणे, बँकेचे देणे च इतर देणी व आमचा उदरनिर्वाह करु. असेही सोमेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
0 Comments