Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ राष्ट्रवादीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

मोहोळ राष्ट्रवादीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

मोहोळ (क.वृ.)ः- सध्या भारत देशासह आपल्या  परिसरा मध्ये कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. या महामारीच्या रूग्णांना रक्त पुरवठा कमी पडत असल्यामुळे मोहोळ, पंढरपूर, उ.सोलापूर या तालुक्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघात असलेल्या प्रत्येक गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोज न करुन रुग्णां ना रक्त कमी पडू देवू नये असे आवाहन माजी आ.राजन पाटील यांनी केले आहे. या आवाहानाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बुधवार दि.१०जून रोजी सकाळी १०.१० ते दु.५ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, मोहोळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे सदर रक्तदान शिबिर आ.राजन पाटील व आ.यंशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 
सदर शिबिरामध्ये जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून देशहिताचे कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडविण्यासाठी आपण रक्तदान करावे असे आवाहनही केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments