Ads

Ads Area

जिल्हयासाठी 9414 कोटींचा पतपुरवठा आराखडा -पीक कर्ज, शेतीसाठीच्या भांडवली कर्जाला प्राधान्य:अग्रणी बॅक व्यवस्थापक सोनवणे

जिल्हयासाठी 9414 कोटींचा पतपुरवठा आराखडा

पीक कर्ज, शेतीसाठीच्या भांडवली कर्जाला प्राधान्य:अग्रणी बॅक व्यवस्थापक सोनवणे
             


सोलापूर - सोलापूर जिल्ह्यासाठी  सन 2020-21 साठीच्या 9414.57 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडयास मंजुरी देण्यात आली. या आराखडयात पीक कर्ज आणि शेतीसाठीचे भांडवली कर्जाला प्राधान्य् देण्यात आले असून  या दोन्ही घटकांसाठी 6746.58 कोटी रुपयांचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक संतोष सोनवणे  यांनी दिली.
             सन 2020-21 आर्थिक वर्षासाठीचा संभाव्य् पतपुरवठा आराखडा नाबार्डच्या वतीने तयार करण्यात आला. हा आराखडा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. या आराखडयातील नियोजनानुसार बॅकांनी पतपुरवठा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. या वेळी बॅक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, नाबार्डाचे जिल्हा व्यवस्थापक  प्रदीप झिले, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, आदी उपस्थित होते.
            सोनवणे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या शेतक-यांचे उत्पन्न् 2022 पर्यंत दुप्पट करणे आणि सर्वांसाठी घरे उपल्ब्ध करुन देणे या धोरणानुसार हा पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. आराखडयात शेती आणि शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य् देण्यात आले आहे.
·        पतपुरवठयातील नियोजन-
            पीक कर्ज- 4051.01 कोटी रुपये.
            शेतीसाठी भांडवली कर्ज- 2695.57 कोटी रुपये.
            लघु आणि मध्यम उदयोग- 1916.28 कोटी रुपये.
            शैक्षणिक कर्ज- 122.29 कोटी रुपये.
            गृह कर्ज- 507.55 कोटी रुपये.
            वैकल्पिक उर्जा उदयोग- 17.09 कोटी रुपये.
            सामाजिक विकास क्षेत्र- 86.33 कोटी रुपये.
            निर्यात उदयोग- 18.45 कोटी रुपये.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close