Ads

Ads Area

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व पोलीस बांधवाना २००० मास्क वाटप

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व पोलीस बांधवाना २००० मास्क वाटप 


सोलापूर (क.वृ):- सोलापूर चे पालकमंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांचा वाढदिवस 1 जुन ला झाला हा वाढदिवस कोणतेही उत्साह वर्दक डामडौल व कार्यक्रमने साजरा न करता आदरणीय  शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा जपत आपत्कालीन कठीण परिस्थितीत जिवाची बाजी लावून आपल्या साठी लढणार्या पोलीस बांधवांनसाठी वाढदिवसाचे औचित्य साधून 2000  मास्क भेट 


 जगभरात महाभयंकर कोरोनाच्या  महामारी ने धैमान घातले आहे या माहामारीशी डॉक्टर पोलिस आशा वर्कर्स आणि प्रशासन हे आपल्या जीवाची पर्वा न करता लढा देत आहेत या आपत्कालीन कठीण परिस्थितीत झुंज देत असताना अनेक डाॅक्टर्स नर्सस व पोलीस यांना शहीद व्हावे लागले त्यामुळे पालकमंत्री दत्ता त्रय मामा भरणे यांचा वाढदिवस साजरा न करता  ह्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कोरोना विरुद्धच्या लढाईत लढणारे  सोलापूर शहरातील सर्वच पोलिस बांधवांना आदरपुर्वक 2000 हजार  मास्कची भेट व पत्र DCP वैशालीजी कडुकर यांच्या कडे  सुपूर्त करण्यात आली.


तसेच पालकमंत्री यांच्या  वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाच्या वतीने जुन महिन्याभरात 1000 रोपांचे वृक्षारोपण करणार आज प्रातिनिधिक स्वरूपात  वृक्षारोपणचा शुभारंभ करण्यात आला....

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close