तर नागरिकांनी अर्थ व्यवस्थेला चालना द्यावी- पोलीस अधीक्षक मनोज पाटील
अकलुज(प्रतिनिधी)- लॉकडाऊनमध्ये कोरोना विषाणुने आपल्याला अव्हान दिले होते.पण आता नागरीकांनी आवश्यक ती सर्व काळजी घेवुन आपले ऊद्योग चालु करावेत.त्याचप्रमाणे नागरीकांनी आता घरा बाहेर पडुन चेस द वायरस ही संकल्पना प्रभावीपणे राबवुन अर्थ व्यवस्थेला चालना द्यावी असे अवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अकलुज येथे पत्रकार परीषदेमध्ये नागरीकांना केले.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होवु नये तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन अर्थ व्यवस्था पुर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जनतेला केले.
यावेळी कोरोना विषाणु संदर्भात पोलीस विभाग ,महसुल विभाग,आरोग्य विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे अध्यक्षतेखाली दि.५ जुन रोजी बार्शी,माढा व करमाळा तालुक्यांसाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले,अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे ऊपस्थितीत बार्शी येथे पार पडल्याचे सांगितले .
यावेळी सोलापुर ग्रामीण घटकाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांनी मिळुन करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.यामध्ये कोरोना बाधीत रुग्णांचे संपर्क शोधणे.प्रतिबंधीत क्षेत्राची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि स्थलांतरीत व्यक्तींबाबत करावयाची ऊपाय योजना याविषयी चर्चा करुन चेस द वायरस ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे अवाहन केले.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक यांनी प्रतीबंधीत व बफर झोन मधील सर्व शासकीय व खाजगी दवाखाने,सर्व प्रकारची औषध दुकाने यांनी विषाणु संसर्गाची लक्षणे असणार्या इसमांची माहिती तालुका अरोग्य अधिकारी यांना देण्याच्या सुचनाही यावेळी दिल्या.तसेच चेस द वायरस या नवीन संकल्पनेचे जुन्या पध्दतीपेक्षा असणारे फायदे सांगुन विविध ऊपाय योजनेमुळे विषाणुचा प्रसार रोखुन त्याची साखळी तोडण्यास जिल्हा प्रशासन यशस्वी होईल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
अकलुज येथील नागरीकांनी स्वयंशिस्तीमुळेच अकलुज कोरोनामुक्त आहे अशी कौतुकाची थापही त्यांनी अकलुजकरांच्या पाठीवर मारली.
तसेच जुन अखेर जिल्हाबंदी असेल असे जिल्हाबंदी विषयी सांगितले .तर माळशिरस तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जिल्हाबंदी सारखे अवघड काम यशस्वीपणे पार पाडल्याचे सांगुन पोलीसांच्या अविरत व प्रामाणिक कामाची पोच पावतीही दिली.
मद्य विक्री करताना नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने बंद केल्याचेही पोलीस अधिक्षक यांनी यावेळी सांगितले .तसेच जिल्ह्यात विविध प्रकारचे १९००च्या आसपास गुन्हे दाखल आहेत.जिल्ह्यात ११हजारांपैकी ९ .५ हजार तर तालुक्यातुन १५४६पैकी १५३७ वाहने नागरीकांना त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीतीही यावेळी देवुन अफवा पसरविण्या संदर्भात ६ गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु,पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर ऊपस्थित होते.
पोलीसांच्या अरोग्याविषयी पोलीस अधीक्षक म्हणाले,
पोलीसांवरील वाढता ताण लक्षात घेवुन सर्वांना कामकाचे १२तास दिले आहेत.पोलीस मुख्यालयातील पोलीसांना दिड महिन्यांच्या कामानंतर पाच दिवसांची सुट्टीही दिली जात असल्याचे सांगितले .
त्याचप्रमाणे पोलीसांचे अरोग्यासाठी २० हायड्रोक्सि क्लोरोक्वीन गोळ्या तयार आहेत.तसेच अर्सेनीक,आयुर्वेदीक काढा,वीटँमीनच्या गोळ्या मल्टीविटँमिन मास्क,सँनिटायझर,काही प्रमाणात पी.पी.ई.किट.आणि वैद्यकीय दृष्टीने संरक्षक राहण्याच्या सुचना व आहार विषयक सल्लाही दिला आहे.तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले १३पैकी १३ कर्मचारी बरे झाल्याचेही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यावेळी आवर्जुन सांगितले .
0 Comments