Hot Posts

6/recent/ticker-posts

वाळू माफियांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन

वाळू माफियांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन

 सांगोला ( प्रतिनिधी )  कोळा ता सांगोला येथे वाळूमाफिया यांनी कोळा मंडळचे मंडळाधिकारी ए. जी. जाधव आणि इतर तीन सहकारी तलाठ्यांना बेदम मारहाण केेल्ययाच्या  निषेधार्थ  सांगोला तालुका तलाठी संघ  आणि महसूल कर्मचारी संघाच्या वतीने  सहा जून पासून  कामबंद आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती सांगोला तलाठी संघाचे अध्यक्ष विनोद भडंगे आणि सचिव कुमाररवी राजवाडे  यांनी दिली.


     याबद्दल अधिक माहिती अशी की, दिनांक पाच जून 2020 च्या रात्री  तहसीलदार योगेश खरमाटे यांनी  भ्रमणध्वनीद्वारे दिलेल्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी एन.जी. जाधव,तलाठी एच.एम.काटकर,तलाठी ए. बी.नवले आणि इतर सहकारी तलाठी यांचे पथक  कोळा येथेअवैध वाळू उत्खनन रोखणेकरिता गेले असता आलदर वाडी येथे बोलेरो आणि इनोव्हा गाडीतून आलेल्या  उमेश कोळेकर रा.आरेवाडी  ता- कवठेमहांकाळ, अल्ताफ आतार रा- कोळा ता- सांगोला, कृष्णा हरीबा गडदे रा.गौडवाडी ता- सांगोला,शिवाजी कोळेकर,आणि (अक्षय पूर्ण नाव नाही)  व इतर पंधरा ते वीस वाळूमाफियांनी मंडळ अधिकारी जाधव, तलाठी एच. एम .काटकर,  तलाठी ए.बी. नवले तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर तलाठयाना  वाटेत अडवून लाठी,काठी, लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मंडळाधिकारी जाधव, कोळ्याचे तलाठी एच.एम. काटकर,बुद्धेहाळ तलाठी ए.बी. नवले हे जबर जखमी झाले. तसेच तलाठी ए.बी नवले यांच्या जवळील एक अँड्रॉइड मोबाईल व तलाठी काटकर  यांच्या जवळील पैशाचे पाकीट व एटीएम कार्ड जबरदस्तीने लुबाडून नेले असल्याची फिर्याद मंडळाधिकारी एन.जी. जाधव यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.


     गौणखनिज या विषयासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नेमून दिलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समिती किंवा पोलिस बंदोबस्त व नायब तहसिलदार दर्जाचा अधिकारी देत नाही तोपर्यंत सांगोला तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी तसेच महसूल कर्मचारी संघटना, सांगोला लिपिक अव्वल कारकून संवर्ग  हे सर्व आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज (कोरणा विषयी कामकाज) वगळून इतर सर्व महसूली कामकाजावर बहिष्कार करून काम बंद आंदोलन करीत असल्याची माहिती सांगोला तलाठी संघाच्या पदाधिकारी यांनी दिली आहे.  तसेच मंडळाधिकारी आणि  तलाठी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तलाठी आणि महसूल संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सदर आरोपीना अटक व कारवाई न झाल्याने, काम बंद आंदोलनामुळे जनतेच्या होणार्‍या गैरसोयीबद्दल पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन जबाबदार राहतील असा इशाराही तलाठी संघ आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने दिला आहे. सदर आशयाचे निवेदन  जिल्हाधिकारी सोलापूर, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सोलापूर, उपविभागीय अधिकारी मंगळवेढा,तहसीलदार सांगोला, पोलिस उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांना संघटनेच्या वतीने दिले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments