Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभू च्या पाण्याने दुष्काळी तालुक्यातील शेतकरी सुखी व संपन्न होईल--आम.शहाजी बापू पाटील

टेंभू च्या पाण्याने दुष्काळी तालुक्यातील शेतकरी सुखी व संपन्न होईल--आम.शहाजी बापू पाटील


मेथवडे बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याचे दिले आदेश



सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे पाणी तालुक्यामधे आणण्यात आ. शहाजीबापू पाटील यांना यश मिळाल्याने काल बलवडी, नाझरे व चिनके येथे पाणी पूजन करून शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मेथवडे बंधाऱ्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे आदेश आ. शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे पाणी सांगोला तालुक्याला भेटले असल्याने काल गुरुवार दिनांक अकरा रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी बलवडी, नाझरे व चिनके येथे पाणी पूजन करून शेतकरी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे सोडण्यात आलेले सदरचे पाणी हे आटपाडी तलावातून 400 क्यूसीएस ने सोडण्यात आल्याने सदरचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे. या पाण्याचा टेंभू लाभक्षेत्रातील बलवडी, वझरे, नाजरे, वाटंबर, वासुद, अकोला, कडलास, वाडेगाव, बामणी,  सावे, मांजरी, देवळे, मेथवडे अशा सतरा गावातील शेतीसाठी लाभ मिळणार आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी एकच दार टाकून मेथवडे बंधारा पर्यंत पाणी चांगल्या गतीने पोहोचले जाईल याची काळजी घेण्याच्या सूचना शाखा अभियंता मोरे व डेप्युटी इंजिनिअर केंगार यांना दिल्या. यावेळी विजय शिंदेे, साहेबराव शिंदे, विकास मोहिते, तानाजी काका पाटील, पांडुरंग मिसाळ, विनायक मिसाळ, दादा वाघमोडे, मुकुंद पाटील, राजू खरात, राजेंद्र पाटील यांच्यासह बलवडी, नाजरा व चिणके  येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्हाळी आवर्तनाचे टेंभूचे पाणी शेतीसाठी उपलब्ध झाल्याने सतरा गावातील सर्व शेतकऱ्यांमधे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments