विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
अकलूज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज शहर मुस्लीम समाजाच्या वतीने शाही मस्जिद व कब्रस्थान परिसरात बज्मे अन्वारे सुफिया मदरसा चे अध्यक्ष हाजी चाॕदशा काझी व समाज्यातील मान्यवरांच्या हस्ते व्रुक्षारोपन करणेत आले.
या वेळी बज्मे अन्वारे सुफिया मदरसा चेसचिव युसुफभाई शेख, महान सुफीसंत सोफी बाबा यांचे साहबजादे मकसूदबाबा, संचालक नाबिलाल तांबोळी,हाजी दादाभाई मोहळकर, मेबंर दादाभाई तांबोळी,बागवान मस्जिद चे अध्यक्ष युनुसभाई बागवान,ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख ,अस्लम सय्यद, हमीदभाई मुलाणी,सलीम शेख छोटा ,कलीम फकीर,इम्रानभाई मुलाणी,जमीर शेख ,हाजी बशीर शेख,यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम करणेसाठी जिल्हाध्यक्ष ॲड. वजीर शेख व बादशहा शेख ,पत्रकार एम.एम.शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. चंद्रकांत कुंभार,प्रसाद जोगळेकर आवर्जुन उपस्थित होते.
0 Comments