आईच्या स्मरणार्थ प्रकाश सावंत यांनीमुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 11 हजार 111 रुपये
आईच्या स्मरणार्थ प्रकाश सावंत यांनीमुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 11 हजार 111 रुपये
मुंबई दिनांक १२: नवशक्ती दैनिकाचे सहाय्यक संपादक प्रकाश सावंत यांच्या मातोश्री सुलोचना रामचंद्र सावंत यांचे १८ मे २०२० रोजी त्यांच्या चिपुळण तालुक्यातील निर्व्हाळ गावी निधन झाले. आईच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईत परतलेल्या सावंत कुटुंबियांनी त्याही परिस्थितीत सामाजिक भान जपले आणि आईच्या स्मरणार्थ ११ हजार १११ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड खात्यात जमा केली. त्याचबरोबर प्रकाश सावंत यांनी कुर्ला येथे तर त्यांचे भाऊ प्रविण सावंत यांनी बोरिवली येथे रक्तदानही केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा केल्याबद्दल आभार व्यक्त करताना सावंत परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.
0 Comments