Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्यांनी सांगोला तालुक्याच्या पाण्याला अडथळा केला त्यांनी यापुढे आमची काळजी करू नये-सूर्यकांत घाडगे

ज्यांनी सांगोला तालुक्याच्या पाण्याला अडथळा केला त्यांनी यापुढे आमची काळजी करू नये


सांगोला/प्रतिनिधी::- मागील 50 वर्षांपासून सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेणाऱ्या नेत्यांनी सांगोला तालुक्यातील पाण्याबाबत चिंता करूनये. त्यासाठी सांगोला तालुक्यात शिवसेनेचे आमदार शहजीबापू पाटील व स्थानिक नेते मंडळी सक्षम आहेत. ज्यांनी आजपर्यंत तालुक्यातील पाण्याच्या वाटा बंद ठेऊन इथला शेतकऱ्याच्या प्रगतीला अडथळा निर्माण केला त्यांना सांगोलच्या पाण्याबाबत किती आस्था आहे हे तालुक्यातील जनता जाणून आहे.त्यामुळे यापुढे तालुक्यातील शेतकऱ्याला शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी ढवळा ढवळ करणाऱ्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे यांनी दिला.
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदायिनी असणाऱ्या टेंभू , म्हैसाळ व नीरा उजवा कालवा या योजना आता मार्गस्थ होत आहेत. सध्या राज्यात आघाडीचे सरकार असून तालुक्याच्या शेतीच्या पाण्याबाबत आमदार शहजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या कडे टेंभू व एन.आर.बी.सी. या योजनेतून उन्हाळी आवर्तन मिळविण्याकरिता प्रयत्न केले होते.त्यामुळे सध्या सांगोला तालुक्याच्या इतिहासात प्रथमच दोन्ही योजनेतून उन्हाळी आवर्तन मिळाले आहे. 
आजपर्यंतच्या कालावधी मध्ये शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाकडून टेंभू,म्हैसाळ व निरेचे पाणी मिळविण्याकरिता शेतकऱ्यांसह विविध आंदोलने करण्यात आली होती.सध्या या योजना पूर्णत्वास येत असून नजीकच्या काळात याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना कायम स्वरूपी होणार आहे.त्यामुळे आजपर्यंत तालुक्याच्या पाण्याला अडथळा निर्माण करणाऱ्या आजूबाजूच्या तालुक्यातील नेते मंडळींनी सांगोला तालुक्याच्या पाण्याची काळजी करू नये.तालुक्याच्या पाण्यासाठी सांगोला तालुक्यातील नेते मंडळी घटगंभीर आहेत.शिवाय सध्या राज्यात आघाडीचे सरकार असून मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील व या योजनेचे अधिकारी तालुक्याला पाणी देण्यासाठी अनुकूल आहेत.यामध्ये कोणी विघ्न आणून तालुक्यातील शेतकऱ्यांचा श्राप घेऊ नये अन्यथा शिवसेना स्टाईलने दखल घेतल्या शिवाय राहणार नाही.असे शिवसेना 
तालुकाप्रमुख सूर्यकांतनाना घाडगे यांनी  इशारा दिला
Reactions

Post a Comment

0 Comments