ब्लड बँक कर्मचाऱ्यांना पीपीई किट व ५० लाखाचा विमा कवच दयावा- डाॅ.धवलसिंह
अकलूज(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. सदर आवाहानास अनुसरून राज्यभर विविध भागात रक्तदान शिबीरे आयोजीत करण्यात येत आहेत. सदर रक्तदान शिबिरात ब्लड बँकेचे वतीने सोशल डिस्टेंन्स व इतर नियम अटी पाळल्या जात आहेत. परंतु दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढत असलेने ब्लड बँकेचे कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढत असुन अशा परिस्थितीत ब्लड बँकेचे कर्मचारी अत्यंत तोकड्या सुविधा मध्ये अनेकांचे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालुन रक्तदान शिबिरात सेवा देणेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्व ब्लड बँकेचे कर्मचारी यांना चांगल्या दर्जाचे पीपीई किट देणेत यावे व इतर कोरोना योद्धयाप्रमाणे ब्लड बँक कर्मचारी यांचा ५० लाख आरोग्य विमा जाहीर करावा अशी मागणी डाॅ.धवलसिंह मोहीते-पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे.
0 Comments