Hot Posts

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेडतर्फे विविध समाज उपयोगी मागण्यांसाठी सातत्य पुर्ण पाठपुरावा, माढा तालुक्यात कोव्हिड 19 केंद्र सुरु

 संभाजी ब्रिगेडतर्फे विविध समाज उपयोगी मागण्यांसाठी सातत्य पुर्ण पाठपुरावा, माढा तालुक्यात संकेत मंगल कार्यालय कुर्डुवाडी येथे कोव्हिड 19 केंद्र सुरु




माढा-सोलापूर जिल्ह्यात माढा तालुका *संकेत मंगल कार्यालय कुर्डुवाडी येथे कोव्हिड 19 केंद्र सुरु* करण्यात आले. या पुढे तालुक्यातील रुग्णांना तपासणीसाठी सोलापुर येथे जाण्याची गरज भासणार नाही. सदर रुग्ण येथेच तपासले जातील. आज या केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पंलगे, डॉ. पाटलोजी चव्हाण, डॉ. अमोल माने, डॉ. संजीव गरड, यांच्याशी विविध विषयांवरती चर्चा झाली. 
*यावेळी डॉ. अमोल माने यांनी कोरोना बाबत समाजप्रबोधन आवश्यक असल्याचे मत मांडले.* कोरोना बाधित रुग्णाची तपासणी करणार्या डॉक्टर बांधवाना देखील त्रास होत आहे कुटबांसहित समाज देखील त्यांना सहकार्य न करता अपराधी नजरने पाहतात आशी खंत देखील सर्व डॉक्टरांनी व्यक्त केली. 

यावेळी *संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातुन समाजप्रबोधना साठी पुढील काळात  प्रयत्न करण्यात येथील असे पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार उद्योजक इंजि. मनोजकुमार गायकवाड* यांनी अधोरेखीत केले. यावेळी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष  सचिन जगताप,मसेसं जिल्हा सचिव विजयकुमार परबत, जिल्हा सचिव सुहास टोनपे, ता.अध्यक्ष बालाजी जगताप, मेजर अरुण जगताप,ता. उपप्रमुख अविनाश पाटील, करमाळा संपर्क प्रमुख प्रभाकर शिंदे, कव्हे शाखा प्रमुख सागर चोपडे इ. उपस्थीत होते.
Reactions

Post a Comment

0 Comments