Hot Posts

6/recent/ticker-posts

दिल्लीच्या तख्तावर शिवसैनिकाला बसविणे हाच वर्धापनदिनाचा संकल्प : उध्दव ठाकरे

दिल्लीच्या तख्तावर शिवसैनिकाला बसविणे हाच वर्धापनदिनाचा संकल्प : उध्दव ठाकरे


सोलापूर : शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी राज्यभरातल्या शिवसेना पदाधिकार्‍यांशी व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे संवाद साधला.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी अस्मिता व्हिजनच्या कार्यालयात एकत्र येत, फिजिकल डिस्टन्स व मास्क, सॕनिटायझर आदींचा वापर करत सहा बाय आठ एलईडी स्क्रीनवर हा संवाद पाहिला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे,शिवसेनानेते व मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, सुनील शेळके, महेश धाराशिवकर, कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी, युवासेनेचे मनीष काळजे, विठ्ठल वानकर, उपशहरप्रमुख शंकर चौगुले, संताजी भोळे, निरंजन बोध्दुल, भागवत जोगदनकर, रवी कांबळे, अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख, शहरप्रमुख योगेश पवार, प्रवीण घाडगे, संतोष गद्दी, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख योगीराज पाटील, संतोष सिंदगी, धर्मराज बगले, महिला आघाडी शहर संघटिका सावित्रा स्वामी, नागमणी भंडारी, छाया वायदंडे व ज्योती बिराजदार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना "जिथे संकट, तिथे मदतीला शिवसैनिक धावून गेलाच पाहिजे" अशी अपेक्षा व्यक्त करत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबीरे आयोजित करावीत असे आवाहन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर शिवसैनिकाला दिल्लीच्या तख्तावर बसविणे हे आपले स्वप्न असून आज सर्व शिवसैनिकांनी मिळून तसा संकल्प करुया असे उध्दव ठाकरे म्हणाले. तर 'गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक' या सूत्राने कार्य करत पक्षसंघटना अधिक बळकट करण्याची आवश्यकता शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख ना. आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली. प्रारंभी बोलताना संजय राऊत यांनी एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न बोलून दाखवले. 
दुपारी सव्वाबारा ते दोन वाजेपर्यंत चाललेल्या या संवादादरम्यान स्क्रीनवर उध्दवसाहेबांचे आगमन होताच सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. आदी घोषणा देत जल्लोष केला.
तीस-पस्तीस वर्षांपासून शिवसेनेशी नाळ जुळलेली आहे. आदरणीय पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा कडवट शिवसैनिक निर्माण करुन त्यांची मोट बांधण्याचे कार्य करेन व पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानभवनात जिल्ह्याचा वाटा सन्मानजनक राहण्यासाठी प्रयत्नशील राहीन. 
Reactions

Post a Comment

0 Comments