Hot Posts

6/recent/ticker-posts

खा.गांधींच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस वतीने कोरोना योद्धाचा सत्कार व फेस शिल्ड चे वाटप

खा.गांधींच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस वतीने कोरोना योद्धाचा सत्कार व फेस शिल्ड चे वाटप

      मोहोळ (क.वृ.):- कोरोनाच्या संकट काळात आरोग्य विभाग आणि पोलीस खाते यांनी  स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचे कोरोना पासून रक्षण केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कामती पोलिस स्टेशन तालुका मोहोळ  येथे फेस शिल्ड वाटप करण्यात आले.
   यावेळी सोलापूर जिल्हा काॅग्रेस सेवादलाचे अध्यक्ष राजेश पवार, सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात,कमाती पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पत्रकार महेश कुलकर्णी, मोहोळ युवक काँग्रेस चे अध्यक्ष आरिफ पठाण, मोहळ तालुका काॅग्रेस अनु.जाती जाती विभागाचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव,अॅड. मयुर खरात, आकाश राठोड, तात्या खराडे, इंचगाव चे माजी सरपंच तात्या आबा वराडे, जावेद शेख, सौरभ तुळसे अजिंक्य गायकवाड, व तसेच काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments