"सामाजिक कार्यात नव संजिवनी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अग्रेसर राहील" प्रा.संजय शिंगाडे
सांगोला (प्रतिनिधी): सर्वत्र कोरोणाने धुमाकूळ घातला असताना याच कोरोनाच्या वाढत्या प्रादुरभावाला रोखण्यासाठी आणि राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच सांगोला तालुक्याचे युवा नेते महानंदा दूध संघाचे संचालक चंद्रकांत दादा देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला येथील नवसंजीवनी महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यापुढील काळातही या को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहील असे प्रतिपादन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा संजय शिंगाडे यांनी व्यक्त केले.
या रक्तदान शिबिरामध्ये सांगोला शहरातील 51 रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले .सदर रक्तदान शिबिरास युवक नेते चंद्रकांत देशमुख, आणि नूतन विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदिच्छा भेट दिली. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन उद्योगपती बाळासाहेब एरंडे,नगरसेवक सुरेश आप्पा माळी,उपनगराध्यक्ष स्वातीताई मगर, नगरसेवक रफिक तांबोळी,नगरसेवक गजानन बनकर,संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय शिंगाडे, चेअरमन सौ संजीवनी शिंगाडे, संचालिका चंद्रप्रभा माने ,वैशाली बेहेरे, मनीषा राजगुरू यांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवून रक्तदान शिबिर पार पडले .रक्तदात्यांना सॅनिटायझर अर्सेनिक अल्बम ३०, मास्क आणि हेल्मेट भेट देण्यात देण्यात आले.
या वेळी अॅड.धनंजय मेटकरी, अॅड. सत्यवान शेळके, अॅड. सोमनाथ नवले, अॅड. मारुती ढाळे, विजय माने, नवनाथ शिंगाडे, अरुण शिंगाडे, बिरुदेव शिंगाडे, रामचंद्र जानकर सर, कांतीलाल ढेरे सर, उल्हास धायगुडे, शफी इनामदार, इन्नुस इनामदार, प्रदीप तोडकरी, प्रा. बाळासाहेब सरगर, सतीश रेवे, जगन्नाथ टकले, राजू मगर, गोपाल चोथे, डॉ. महादेव कोळेकर, सलीम तांबोळी, अण्णासाहेब मदने, गणेश बडगर, आदिक वाघमोडे, डॉ. रमेश सिद, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चंद्रकांत (दादा ) देशमुख युवा मंच,शेतकरी कामगार पक्ष , पुरोगामी युवक संघटना नवसंजीवनी महिला को. ऑफ. क्रेडिट सोसायटी यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments