Hot Posts

6/recent/ticker-posts

वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवावेत.. नितीन चव्हाण



वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवावेत.. नितीन  चव्हाण


सोलापूर (प्रतिनिधी): महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवार कोरोना महामारीच्या संकटामध्ये सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना 24तास सुविधा देण्याचे काम करत होते. महाराष्ट्र शासनाने या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा अन्यथा विज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत चालढकल करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात 15 ऑगस्ट 2020 रोजी मुंबई मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी दिले आहे. विज कंत्राटी कामगार व शिकाऊ कामगारांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकाच दिवशी देण्यात आलेला आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी मुंबई मंत्रालयासमोर होणाऱ्या आंदोलनात विज क्षेत्रातील कंत्राटी कामगार व शिकावू उमेदवारांनी  महाराष्ट्र शासनाला व प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश भाकरे,  जिल्हा संघटक प्रताप खंदारे, आणि जिल्हा सचिव एल. डी.चव्हाण यांनी केलेला आहे.
हे आहेत कंत्राटी कामगारांचे प्रश्न...
* तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना सरळ सेवा भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे
* शाश्वत रोजगाराची हमी द्यावी
*अपघाताची नुकसान भरपाई द्यावी
*नियमाप्रमाणे वेतन आणि सुविधा द्याव्यात
* कुटुंबासाठी मेडिक्लेम योजना राबवावी
* कामगार कल्याण मंडळाच्या सुविधा द्याव्यात
हे आहेत शिकाऊ उमेदवारांचे प्रश्न....
* प्रसिद्ध केलेली विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी
*ई एस बी सी मराठा आरक्षणाच्या 469 रिक्त जागा त्वरित भरावे
* ऊर्जा मंत्री यांनी घोषित केलेले 25 टक्के आरक्षण तरी द्यावे
* महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादेत वाढ करावी
* स्वयंरोजगार, बेरोजगार सहकारी संस्थांना प्राधान्य कामे द्यावीत
भाकरे
Reactions

Post a Comment

0 Comments