नऊ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून
प्रशासन अधिकाऱ्यावर गुन्हा
कुर्डुवाडी(प्रतिनिधी): एका मुख्यध्यापकाला लाचलुचपत प्रकरणाच्या गुन्ह्यात प्रशासकीय मदत करण्यासाठी प्रशासन अधिकाऱ्याने नऊ लाख रुपयांची लाच घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रशासन अधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की यातील अर्जदार हे मुख्यध्यापक असून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांचेकडून कारवाई झाली होती.त्यावेळी सचिन अरुण अनंतकवळस प्रशासन अधिकारी सध्या नेमणूक नगरपरिषद शिक्षण मंडळ कुर्डुवाडी, रा.कुर्डुवाडी, ता.माढा हे अर्जदार यांचे सक्षम अधिकारी होते.अर्जदारास लाचलुचपत प्रतिबंधक गुन्ह्यात मदत करण्यासाठी प्रशासन अधिकारी सचिन अरुण अनंतकवळस यांनी स्वतः सात लाख रुपये व सागर सिद्धेश्वर वसेकर याचे मार्फत दोन लाख रुपये स्वीकारले असल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे.दोन्ही आरोपीवर लाचलुचपत प्रतिबंधक उपअधीक्षक संजीव पाटील यांनी कुर्डुवाडी पोलीसात फिर्याद दिली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे व पोलीस हवालदार चंद्रकांत पवार हे करीत आहेत.
0 Comments