Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथे कोविड केअर सेंटर, कोवीड हॉस्पिटल केअर सुरू करावे - देशमुख

टेंभुर्णी येथे कोविड केअर सेंटर, कोवीड हॉस्पिटल केअर सुरू करावे - देशमुख


उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी


टेंभुर्णी (प्रतिनिधी):- टेंभुर्णी येथे कोविड केअर सेंटर, कोवीड हॉस्पिटल केअर व डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख विठ्ठल देशमुख व विलास देसाईराव देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी ज्योती कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
गेली काही दिवसापासून देशांमध्ये कोरोनाच्या महामारीची संकट असून या संकटात प्रशासन योग्य नियोजन करत आहे. परंतु कोरोना बाधित रुग्ण सापडला असता त्याच्या वरती उपचार जिल्ह्याच्या ठिकाणी केला जातो त्याच्या संपर्कातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी कोवीड सेंटर मध्ये ठेवले जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी नियोजनाची कमतरता जाणवत असल्याने सर्वसामान्य माणसांमध्ये रोग बरा पण उपचार वाईट असे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. 
कोरोना आजार ग्रामीण भागात पाय पसरू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. तरी टेंभुर्णी व आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग झाल्यास सदर रुग्णास टेंभुर्णी या ठिकाणीच उपचार व्हावेत अशी मागणी निवेनाव्दारे करण्यात आली आहे.  
टेंभुर्णी हे गाव पुणे सोलापूर हायवे, नगर विजापूर हाय, लातूर पुणे हायवे असे अनेक मार्गांनी जोडले असल्याने जंक्शन म्हणून ओळखले जाते. टेंभुर्णीच्या आजूबाजूची अनेक गावे शिक्षण, आरोग्य, नोकरी अशा अनेक कारणासाठी टेंभुर्णी येथे मोठ्या प्रमाणात रहिवासासाठी आहेत. टेंभूर्णी येथील विकसित झालेली एमआयडीसी, कारखानदारी व परिसरातील गावांची मुख्य बाजारपेठ देवाण-घेवाण हि टेंभुर्णी येथूनच चालते म्हणून भविष्याचा विचार करता टेंभुर्णी येथे कोविड केअर सेंटर, कोवीड हॉस्पिटल केअर उपलब्ध व्हावे अशी मागणी टेंभुर्णीकर यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
निवेदना वरती उपसरपंच धनाजी गोंदील, ग्रा पं सदस्य गणेश केचे, शिवसेना उपशहर प्रमुख प्रशांत सोनवणे, सुरेश लोंढे, प्रशांत देशमुख, लखन माने, प्रल्हाद साळुंके, विशाल नवगिरे, राहुल चव्हाण, अनिल माने, सचिन जाधव इत्यादींच्या सह्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments