जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील जवानाला वीरमरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 23, 2020

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील जवानाला वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील जवानाला वीरमरण 



पुलवामा: आज पहाटे जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील पानगावचा रहिवाशी असलेला एक जवान शहीद झाला आहे. दोन दहशतवाद्यांना या चकमकीत कंठस्नान घातल्याची माहिती असून अजूनही परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सुनील दत्तात्रय काळे (41) हे या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. काहीच महिने काळे यांच्या निवृत्तीला शिल्लक होते, पण आपली सेवा त्यांनी वाढवून घेतली होती. तसेच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. पण लॉकडाऊनमुळे ते दिल्लीला जाऊ शकले नाहीत.
दहशतवाद्यांशी आज पहाटे लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. सुनील काळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना शेतीची आवड होती. परिवाराची तसेच आपल्या मित्रांची काळजी घेणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांची सुट्टी मंजूर होती, पण ते लॉकडाऊनमुळे येऊ शकले नाहीत, त्यांनी नवीन घर बाधले असून अद्याप ते तिथे राहायलाही गेले नाहीत, त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त कळताच पूर्ण पानगाव बंद करण्यात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages