आरोग्य केंद्रासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार फंडातून 50 लाखाचे साहित्य वाटप.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 20, 2020

आरोग्य केंद्रासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार फंडातून 50 लाखाचे साहित्य वाटप..

आरोग्य केंद्रासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार फंडातून 50 लाखाचे साहित्य वाटप..


सांगोला(क.वृ.) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आमदार फंडातून ग्रामीण रुग्णालय सांगोला व प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी,पंढरपूर यांना 1300 पि पि ई किट 3000 मास्क,सॅनिटायझर बॉटल्स 2000, ट्रिपल लेयर मास्क 3000, विविध आकाराचे रबर ग्लोज दहा इन्फरेड थर्मल स्कॅनर व 2000 व्हीटीएम किट असे साहित्य ग्रामीण रुग्णालय सांगोला येथून वितरण केले. आमदार शहाजीबापू पाटील यांनी  पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन ते सांगोला मतदार संघातील आरोग्य केंद्रासाठी वरील सर्व साहित्य उपलब्ध करून दिले त्या साहित्याची पाहणी करून सर्व साहित्य आरोग्य केंद्रांना व उपकेंद्रांना वितरण केले. वरील साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आमदार शहाजीबापू यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाची पूर्ण पाहणी केली नव्याने बांधकाम सुरू असणाऱ्या ट्रॉमा केअर सेंटरची ही पाहणी केली यावेळी आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्या समवेत भाऊसाहेब रुपनर माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ नगरसेवक आनंदा माने सूर्यकांत मेटकरी  तहसीलदार योगेश खरमाटे. गटविकास अधिकारी संतोष राऊत,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सीमा दोडमनी ,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर पूजा साळे मॅडम  यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages