विठ्ठलवाडीचा कदम झाला उपशिक्षणाधिकारी शेतकरी कुटुंबातील मुलगा राज्यसेवा परीक्षेत राज्यात 8 वा
विठ्ठलवाडी ता.माढा येथील नूतन उपशिक्षणाधिकारी नितेश कदम यास पेढे भरवताना आई इंदूमती व वडील नेताजी कदम.
माढा (क.वृ.):- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी सारख्या छोट्याशा ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी नेताजी कदम यांचा मुलगा नितेश कदम याची महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल 2019 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी वर्ग-2 पदी निवड झाली आहे.निवडीचे वृत्त कळताच मित्रमंडळी व नातेवाईकांनी गुलालाची उधळण करीत तोफांची सलामी देत गावात पेढे वाटत ग्रामस्थांच्या व विविध संस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या वतीने 420 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये नितेश कदम याने लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये 900 पैकी 523 गुणांच्या जोरावर खुल्या संवर्गातून राज्यात 8 वा क्रमांक पटकाविला आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी व माध्यमिक शिक्षण संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व केंद्रीय नवोदय विद्यालय पोखरापूर येथे तर सायन्स शाखेची पदवी पूणे येथून घेतली.त्यानंतर कोठेही खाजगी क्लास न लावता स्वयंअध्यनाने हे उज्ज्वल यश संपादित केले आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचा मुलगा अधिकारी झाल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याची आई इंदूमती कदम या अंगणवाडी शिक्षिका आहेत.त्याला पोलिस उपअधीक्षक सचिन कदम व सहाय्यक कक्ष अधिकारी सुदर्शन शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल त्याचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, उपशाखाप्रमुख मोहन कदम, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, सरपंच अरुण कदम, चेअरमन अनिलकुमार अनभुले, डॉ.किशोर गव्हाणे, सहाय्यक आयुक्त संतोष जाधव,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे, दत्तात्रय सस्ते, बालाजी गव्हाणे, उपसरपंच अनिलकुमार बरकडे, हनुमंत पाटील, डॉ.मोहन शेगर, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, डॉ.नेताजी कोकाटे,डॉ.संतोष कदम,श्रीमंत कदम, धनाजी सस्ते, रामचंद्र भांगे,सुनील शेंडगे, राजाभाऊ कदम, गणेश गुंड, अंगद कदम,सुधीर गुंड,सज्जन मुळे, सतीश गुंड, समाधान कोकाटे, दिनेश गुंड,गोरखनाथ शेगर,सुशेन मुळे, नितीन कदम,सौदागर खरात,भिवाजी जाधव,रणजित पाटील, ज्ञानेश्वर तरंगे,वैभव कदम,विकास खैरे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.
0 Comments