Hot Posts

6/recent/ticker-posts

मंडलाधिकारी लकडे यांना तहसीलदार देणार क्लिनचिट

टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा लकडे यांना माढा तहसीलदार देणार क्लीनचिट


टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा लकडे यांना माढा तहसीलदार देणार क्लीनचिट अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. 
याबाबत सविस्तर हकीकत अशी की टेंभुर्णी येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा लकडे यांनी लॅाकडाऊनच्या कालावधीमध्ये गैरकारभार करून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जात आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचे साठे यांनी सांगितले. तरीही संबंधितांनी अजून ही कोणतीच कारवाई केली नसल्याने पुन्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मंडलाधिकारी लकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
टेंभुर्णी येथील मंडलाअधिकारी मनीषा लकडे या मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी व मुरूम तस्करी यामध्ये मलीदा कमवीत आहेत तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे जोमात आले आहेत. याविषयी अनेकदा तक्रारी केल्यानंतर ही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही या मंडळाधिकारी यांना वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणात सहकार्य करताना दिसून येत आहेत यात वरिष्ठांची मर्जी सांभाळली जात असल्या कारणाने यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येईल असे वाटत नाही. 
तसेच covid-19 या महामारी अंतर्गत टेंभुर्णी येथील आश्रम शाळेत उभारण्यात आलेल्या सेंटर  मध्ये  90  ते 100 लोकांचे जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सेंटरमध्ये शेतकरी, सामाजिक संघटनानी व कार्यकर्त्यांनी दिलेले अन्न व फळे  यावरच दरोडा घालण्याचा  प्रयत्न झाला असल्याचा आरोप ही तक्रारदारानी केला आहे . आश्रम शाळेतील कॅमेरा मधील व्हिडिओ चित्रीकरण आधारे पुरावा दिला असताना सुद्धा यांच्यावर वरिष्ठ कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही .यांनी कांदा ,फळे, पाले भाज्या, धान्य अशा जीवनावश्यक वस्तू हडप केले आहेत. यांचे विरुद्ध कोणी आवाज उठला असता यांच्याविरुद्ध पोलिसात खोट्या केसेस दाखल करेन अशी धमकी देण्यात येत असल्याचे तक्रारदारानी सांगितले. 
  जिल्हाधिकारी ,सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असता मंडलाधिकारी लकडे यांनी याच आश्रम शाळेत डान्स व गाण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे . व्हिडीओ चित्राद्वारे तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही.
तसेच यांच्या कार्यालयात दोन कर्मचारी सरकारी कर्मचारी नसताना काम करतात याबद्दल ही नागरिकातून तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. यांचे विरोधात अनेक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात तक्रार दाखल केली आहे. तरीही तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी त्यांच्या तक्रारीकडे कानाडोळा करून या भ्रष्ट अधिकाऱ्याला आपल्या कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी आर्थिक लागेबंधे असल्याकारणाने वारंवार देत आहेत.(कुळकायदा प्रकरणे व वाळू,मुरूम माफीया यांची मंथली यातून मलीदा मिळतो).यासंबंधीचे पुरावे तपासणी अधिकार्‍याकडे दिले जातील. असेही तक्रारदारानी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 
अशा या माढा तहसिल अंतर्गत असणाऱ्या सर्व भ्रष्ट कर्मचारी  बद्दल तक्रार देऊन कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याबाबत जनसामान्यांच्या विश्वासाला तडा जात आहे. लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा. अशीही मागणी तक्रारदारानी शेवटी संबंधितांना कडे केली आहे. 
आशा आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन करणार कर्मचारीच आपत्ती व्यवस्थापनचा कायदा पायदळी तुडवत असतील तर पुढे काय होणार याची कल्पना न केल्यालीच बरी.

 संबंधित तक्रारीबाबत मंडलाधिकारी लकडे यांच्या कडे खुलाशाची मागणी केली होती, त्यांचा खुलासा आला आहे. लाॅकडाऊन नंतर याबाबत निर्णय घेणार आहे. चव्हाण, तहसीलदार माढा.
Reactions

Post a Comment

0 Comments