Hot Posts

6/recent/ticker-posts

माफक व योग्य दरात शेतमाल आपल्या घरात - काशिनाथ भतगुणकी

माफक व योग्य दरात शेतमाल आपल्या घरात - काशिनाथ भतगुणकी 


सोलापूर - ड्रीम फौंडेशन संचलित बसव संगम शेतकरी गटाच्या वतीने 35 शेतकर्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांच्या घरात विक्रीसाठी कार्याध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी घेतला पुढाकार. रोज किमान 12 किंटल शेतमाल सध्या सोलापूरात होतोय विक्री.
कोरोना व लाॅकडाऊनमुळे अनेक शेतकरी शहरात येण्यास भीत असल्याने त्यांचा शेतमाल त्यांच्या बांधावर जाऊन विकत घेऊन ''ना नफा ना तोटा'' या तत्वावर आपल्या पर्यंत पोहचवित आहेत.
यामध्ये मेथी,पालक,वांगी,गवार,कोथिंबीर, दोडका,कोबी,कांदा, मिरची,भेंडी,शेपू,टमाटे,शेवगा शेंगा, राजगिरा,चुका, लिंबू,चिंच,लसूण यासह अनेक ताजा भाजीपाला ग्राहकांना घरात पोहोचवली जाईल. त्यासाठी आपण थेट घरातूनच सायं 5 ते 7 online किंवा मोबाईल वरून ऑर्डर देणे. सकाळी 10 ते 1 या वेळेत नेहरू नगर शासकीय मैदान,AG पाटील कॉलेज समोरील मैदान येथील विक्री केंद्रातून पॅकिंग करून ऑर्डर पोहच केली जाईल. त्यामुळे शेतकरी व ग्राहक खुश, आनंदी आणि सुरक्षित.
Reactions

Post a Comment

0 Comments