कोरोनास आळा घालण्यासाठी पदाधिका-यांचे सहकार्य अपेक्षित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अपेक्षा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 10, 2020

कोरोनास आळा घालण्यासाठी पदाधिका-यांचे सहकार्य अपेक्षित जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अपेक्षा

कोरोनास आळा घालण्यासाठी पदाधिका-यांचे सहकार्य अपेक्षित
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अपेक्षा


          सोलापूर : सोलापुरातील कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा घालण्यासाठी महापालिका  पदाधिका-यांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले.
          कोरोना विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनाबाबत आज महापालिकेतील गटनेते आणि विविध पक्षाचे शहरअध्यक्ष यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त दीपक तावरे, उपमहापौर राजेश काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अशोक पाटील, पोलीस आयुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी म्हणाले, 'कोरोनाचा प्रसार शहरातील विशिष्ठ भागात होत आहे. यापैकी बहुतांशी रुग्ण हे सारीचे आहेत. याबाबत सर्व्हेक्षण सुरु आहे. मात्र नागरिकांकडून पूर्ण सहकार्य मिळत नाही. नागरिकांनी खरी माहिती द्यावी यासाठी पदाधिका-यांनी मदत करायला हवी '.
          बैठकीस खासगी ओपीडी हॉस्प्टिल सुरु करावीत, लोकांना आवश्यक असणा-या वस्तु सहज मिळाव्यात असे नियोजन करायला हवे, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना अन्नधान्य घरपोच पोचवावे, अशा सूचना गटनेत्यांकडून करण्यात आल्या.
          बैठकीस विरोधी पक्ष नेते महेश कोठे, प्रकाश वाले, बाबा मिस्त्री, आनंद चंदनशिवे, श्रीनिवास करली, संतोष पवार, पुरुषोत्तम बरडे, विक्रम देशमुख, चेतन नरोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages