Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांचे दररोज सर्व्हेक्षण होणार

प्रतिबंधित  क्षेत्रातील सर्व नागरिकांचे दररोज सर्व्हेक्षण होणार

प्रतिबंधित क्षेत्रासाठी महसूल, महापालिका, आरोग्य, पोलीस आधिका-यांची संयुक्त पथके

          


सोलापूर : सोलापूर शहराच्या प्रतिबंधित  क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या आरोग्याचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. वैद्यकीय पथकाद्वारे केल्या जाणा-या या सर्व्हेक्षणात कोरोना बाधा झाल्याची लक्षणे  असणा-या नागरिकांना तात्काळ डेडीकेटेड कोव्हीड  हेल्थ सेंटर मध्ये दाखल करुन त्यांचे निदान केले जाणार आहे.
          जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या सनियंत्रण आणि सहाय्यक सनियंत्रण अधिका-यांची बैठक घेतली. त्याबैठकीत त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्याचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी  किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते. प्रतिबंधित क्षेत्रासाठी महसूल, महापालिका, आरोग्य, पोलीस आधिका-यांची संयुक्त पथके स्थापन करण्याचा आदेश महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी काल  जारी केला आहे.
          त्यांनी सांगितले की, शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळत आहेत. मात्र काही ज्येष्ठ रुग्णांवर उपचार करण्याचीही संधी मिळत नाही. कारण अगदी गंभीर परिस्थिती झाल्यावर असे नागरिक उपचारासाठी येतात. यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचे सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे.
          प्रतिबंधित क्षेत्रातील किराणा दुकानदारांना प्रशासनातर्फे सर्व सामानाचा पुरवठा करण्यात येईल. प्रत्येक झोन मध्ये एक रुग्णवाहिका तैनात केली जाईल. प्रतिबंधित क्षेत्राच्या प्रवेश आणि बाहेर पडावयाच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून हालचालीवर देखरेख ठेवली जाणार आहे. सार्वजनिक शौचालय दर दोन तासांनी सॅनिटाईज केली जाणार आहेत, असे आयुक्त तावरे यांनी सांगितले.  
          यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना कक्ष प्रमुख डॉ. एच. व्ही. प्रसाद यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे सर्व्हेक्षण करतांना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली.
          यावेळी बैठकीत उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अनिल कारंडे, अरुणा गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, कमलाकर ताकवले, विजय खोमणे, यांच्यासह महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक होते.
Reactions

Post a Comment

0 Comments