सोशल डिस्टन्स पाळत अरणमधील १५० गरजू कुटुंबांना २ क्विंटल धान्य वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 8, 2020

सोशल डिस्टन्स पाळत अरणमधील १५० गरजू कुटुंबांना २ क्विंटल धान्य वाटप

सोशल डिस्टन्स पाळत अरणमधील १५० गरजू कुटुंबांना २ क्विंटल  धान्य वाटप



मोडनिंब, प्रतिनिधी   : विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे,  माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे, संत सावता माळी देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी ॲड. विजय शिंदे, विद्यमान सरपंच उषाताई टोणपे, माजी सरपंच पांडुरंग राऊत, माजी उपसरपंच काकासाहेब पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका शांता शेंडगे, संत सावता माळी विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिदास रणदिवे ह्यांनी पुढाकार घेतला व  ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केल्याने एक सामाजिक उपक्रम यशस्वी ठरला.
पाच किलो गहू,दोन किलो साखर,गोडेतेल,शेंगादाणे,मसूर डाळ, मीठ प्रत्येकी एक किलो तसेच निरमा पावडर चहा पावडर, साबण यांचे वाटप करण्यात आले.७५० किलो गहू,३०० किलो  साखर तसेच  गोडेतेल  मसूर डाळ  शेंगादाणे मीठ या वस्तू प्रत्येकी दीडशे किलो प्रमाणे जमा करण्यात आल्या होत्या.  चहा पावडर,  वॉशिंग पावडर,  साबण  या वस्तूंचे ही वाटप करण्यात आले.
अरणकरांच्या दानशूर वृत्तीचे दर्शन...।
अरणमधील गरजू कुटुंबांच्या चरितार्थासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम ग्रामस्थांना समोर आला. "हॅलो अरण" या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून  आवाहन करण्यात आले. या आव्हानाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे अरण ग्रामपंचायतीमध्ये जीवनावश्यक वस्तू आठवड्यात जमा केल्या. साखर,गोडेतेल,डाळ, यासह अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात जमा झाल्या.
    काकासाहेब पाटील, बालाजी टोणपे, यशवंत दादा शिंदे, दिग्विजय कांबळे, प्रशांत कोरडे, हरिदास रणदिवे(सर) यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून ह्या उपक्रमाविषयी चर्चा केली होती.
भारत आबा शिंदे, शिवाजी कांबळे, ॲडव्होकेट विजय शिंदे, पांडुरंग राऊत जीवनावश्यक वस्तू जमा करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. या उपक्रमातून ग्रामस्थांच्या दानशूर वृत्तीचे दर्शन घडले  असे मत संत सावतामाळी विद्यालयाचे प्राचार्य हरिदास रणदिवे व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages