बेदाणासाठी साठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी : शिवाजी कांबळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 8, 2020

बेदाणासाठी साठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी : शिवाजी कांबळे


बेदाणासाठी साठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी :  शिवाजी कांबळे



मोडनिंब,प्रतिनिधी  : बेदाणा साठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी  खासदार शरद पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश आणि महाराष्ट्र लॉक डाऊन करण्यात आला आहे जगासमोरील आणि देशासमोरील संकटाचा विचार करता सरकारने घेतलेला लॉक डाऊनचा निर्णय योग्य आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी कायम अडचणीचा सामना करीत विविध फळ पिके पिकवित आहे.
द्राक्षे डाळिंब भाजीपाला खरबूज कलिंगड तसेच इतर अनेक पिके काढणीसाठी आली असताना  बाजारपेठ उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी शेतकऱ्यांची पिके ही रानातच सडून गेली आहेत. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या दहा वर्षात दुष्काळ तसेच अतिवृष्टी व अन्य कारणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे सर्वकाही परिस्थिती सुरळीत असताना सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डॉऊन चे संकट उभे राहिले आहे. सरकारने तातडीने बेदाना साठी ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी तसेच इतर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार शरद पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages