Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ५५९ रक्तदात्यांचे उस्फुर्त रक्तदान

प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ५५९ रक्तदात्यांचे उस्फुर्त रक्तदान


सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष व लायन्स क्लब ३२३ ड १ चे माजी प्रांतपाल प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त काल शुक्रवार दि.२२ मे रोजी सांगोला, नाझरा, कोळा, नाझरा या ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबीरात ५५९ रक्तदात्यानी रक्तदान करुन उस्फुर्त सहभाग नोंदविला.सांगोला येथील रक्तदान शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ञ व लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य ऍड.उदयबापू घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.  या रक्तदान शिबीराप्रसंगी प्रा.प्रबुध्दचंद्र झपके सर यांनी  कोविड १९ लढ्यासाठी मदत म्हणून  ४५ हजार रुपयांच्या ( एक महिन्याची पेन्शन) निधीचा धनादेश  प्रातांधिकारी उदयसिंह भोसले यांचेकडे दिला.यावेळी सौ.शीलाकाकी झपके, श्री.विश्‍वेश झपके श्री सौत्री साहेब यांचेसह विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय स्टाफ उपस्थित होते.
कोविड-१९ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर हे रक्तदान शिबीर संपन्न होत असल्यामुळे आलेल्या प्रत्येक रक्तदात्याचे थर्मल स्किनींग करुन रक्तदान करण्यापूर्वी व रक्तदान केल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करत योग्य ती खबरदारी घेवून रक्तदान शिबीर पार पडले. या शिबीरात सांगोला येथे २१३, नाझरा येथे १५१, कोळा येथे १०४ व लोणविरे येथे ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रेवनील ब्लड बँक, सांगोला या रक्तपेढीने रक्त संकलन केले. सांगोला येथील रक्तदान शिबीरास प्रातांधिकारी उदयसिंह भोसले यांनी भेट देवून प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या रक्तदान शिबीराची पाहणी करुन नियोजनासंदर्भात कौतुक केले. व यापुढे अशा सामाजिक उपक्रमास सहकार्य करण्याची भावना व्यक्त केल्या.
या शिबीरास संस्था सचिव, म.शं.घोंगडे सर, खजिनदार शं.बा.सावंत सर यांनी भेट देवून रक्तदान शिबिराचे कौतुक केले. सदरच्या सर्व ठिकाणचे रक्तदान शिबीरात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, विद्यामंदिर परिवार, लायन्स क्लब सांगोला व झपके सर यांच्यावर प्रेम करणार्‍या ज्ञात-अज्ञात व्यक्तिंनी रक्तदान करून  सदर शिबीर यशस्वी केले.

 शनिवार दि.२३ मे रोजी सांगोला येथे जुन्या कोर्टाजवळील जि.प.प्रा.शाळेत रक्तदान होणार आहे. ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी आज सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उत्स्फुर्तपणे रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे.
Reactions

Post a Comment

0 Comments