काळमवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने मागासवर्गीय कुटुंबाना 15%ग्राम निधीतून जीवनावश्यक वस्तूचे वाटप
करकंब (प्रतिनिधी) :- सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अश्या परिस्थितीत काळमवाडी ग्रामपंचायत यांच्या कडून मागासवर्गीय 15 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले, त्यामध्ये तेल,साखर, शेंगदाणे, डाळ,पोहे, निरमा,साबण इत्यादी वस्तुचा समावेश होता.
काळमवाडी ग्रामपंचायत कडून 350 कुटुंबाना सॅनिटायजर वाटप करण्यात आले. त्यावेळी जि.प.सदस्य गणेश पाटील, माजी सरपंच दादासाहेब शिंगाडे, सरपंच धोंडाबाई करडे, उपसरपंच समाधान दुपडे, ग्रा.सदस्य विक्रम शिंदे, रामचंद्र पवार,ग्रामसेवक धुमाळ मॅडम, पोलीस पाटील जयश्री जाधव,ग्रा.शिपाई बबन जानकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते..
0 Comments