Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्यात २५४६ व्यक्ती संस्थात्मक, तर २१२२ व्यक्ती घरामध्ये विलगीकरणकक्षात -प्रांताधिकारी उदयसिंह भोसले

सांगोल्यात २५४६ व्यक्ती संस्थात्मक, तर २१२२ व्यक्ती घरामध्ये विलगीकरणकक्षात -प्रांताधिकारी उदयसिंह भोसले 


सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहर व तालुक्यांमध्ये आज अखेर घरांमध्ये विलगीकरण ठेवलेल्या व्यक्तींची संख्या ३५१० आहे.त्यापैकी १३८८ व्यक्तीचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असून उर्वरित २१२२ व्यक्तीना अद्यापही घरातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन चे प्रमुख उदयसिंह भोसले यांनी दिली.
      तर संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये अद्याप पर्यंत एकूण ३५७८ व्यक्तीना ठेवण्यात आले होते, त्यापैकी १०३२ व्यक्तींचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला असून त्यांना संस्थात्मक विलगीकरणकक्षामधून सोडण्यात आले आहे, तर २५४६ व्यक्ती  अद्यापही संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहेत. रेड झोन मधून आलेल्या व्यक्तीनी संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये रहावे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये घरातील विलगीकरण कक्षांमध्ये राहण्यास परवानगी दिली असल्यास त्याने घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात तसेच शासनाचे होम कॉरंटाइन करण्याबाबतच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, तसे न केल्याचे निदर्शनास आले तर संबंधितावर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असा इशाराही उदयसिंह भोसले यांनी दिला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments