सांगोला वनपरिक्षेत्र विभागाची कामगिरी : बनकर मळा येथे पक्ष्यांची शिकार केल्यामुळे संशयित दोघांना अटक
सांगोला/प्रतिनिधी - सांगोला शहाराजवळ असलेल्या बनकर मळा येथे काही लोक शिकारीसाठी येणार असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन पाहणी केली असता 2 मोर, 5 लांडोर व 2 चितर मृतावस्थेत आढळून आले. त्याचबरोबर पाहणीदरम्यान त्या ठिकाणी संशयित अशोक अप्पा चव्हाण व तानाजी शिवा चव्हाण रा. दोघेही संजयनगर झोपडपट्टी सांगोला यांना ताब्यात घेतले असून वन्यजीव संरक्षण अधिनियम1972 चे कलम 2,3,9,39,50 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगोला शहराजवळ असलेल्या बनकर मळा येथे काही लोक बुधवार दि 20 रोजी शिकारीसाठी आले असल्याची खबर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली असता वनपाल एस.जे.शिंदे व वनरक्षक डी.एस.देवकर व इतर कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तर त्यांना दोन मोर, पाच लांडोर व दोन चितर मृत अवस्थेत आढळून आले. सदर क्षेत्रात रेष ओढून विषबाधीत मकेचे बी टाकलेले आढळून आले.
तसेच अधिक पाहणीनंतर त्याठिकाणी संशयित दोन इसम त्यामध्ये अशोक अप्पा चव्हाण व तानाजी शिवा चव्हाण रा. दोघेही संजयनगर झोपडपट्टी सांगोला यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पक्षी पकडण्याचे जाळे, एक विळा, मका बिया 50 ग्रॅम, एक मोटारसायकल (एम.एच.13 डब्लू - 4453) हस्तगत केले. व त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम1972 चे कलम 2,3,9,39,50 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत मोर व लांडोर पक्षाचे शवविच्छेदन वनपरिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांनी केले.
नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे ठरले सदर गुन्ह्याची चौकशी सोलापूरचे उपवनसंरक्षक प्रविणकुमार बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. 21 रोजी सहा. वनसंरक्षक आर.एल.नागटीळक, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.डी. बाठे व कर्मचारी यांच्यासमवेत जागेवर जाऊन स्थळ पाहणी केली. स्थानिक स्थळांचा पंचनामा करून सदर आरोपीचे जाब जबाब नोंदवून आरोपीस न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सदर आरोपिंना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे आधिक तपास सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.डी. बाठे करीत आहेत.
0 Comments