लॉकडाऊन काळात टेंभुर्णीत डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया
टेंभुर्णी : - लॉकडाऊन पूर्वी खेळताना डाव्या डोळ्यास मार लागल्यामुळे डोळ्यास आतून सूज येऊन मोतीबिंदू व काचबिंदू झालेल्या युवकावर डॉ.आनंद खडके यांनी तातडीची यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळा वाचविला आहे.
प्रसाद धुळदेव कर्णावर या माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील १७ वर्षीय युवकास लॉकडाऊन पूर्वी खेळताना मार लागून डाव्या डोळ्यास आतून सूज आली होती.यामुळे दृष्टी अत्यंत कमी झाली होती.लॉकडाऊन काळात डोळ्यावरील दाब वाढून काच बिंदू झाला.पुढे त्यास काहीही दिसेनासे झाल्यावर तो आशानंद नेत्र हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ.आनंद खडके यांच्याकडे आला होता.डॉ.खडके यांना तपासणी अंती युवकास मोतीबिंदू,काचबिंदू झाल्याचे व तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे दिसून आले.
यामुळे डॉ.खडके यांनी त्या युवकचे शैक्षणिक,व्यावसायिक करिअरचा विचार करून लॉकडाऊन असताना ही कोरोना विषयी आवश्यक ती सर्व काळजी घेऊन फक्त ड्रॉप मधून भूल टाकून यशस्वी शस्त्रक्रिया करीत लेन्स टाकली आहे.यामुळे सध्या प्रसादला पूर्वी सारखी पूर्ण दृष्टी मिळाली आहे.शस्त्रक्रियेनंतर सूज येऊ नये म्हणून यापुढे ही काळजी घेण्यात येत आहे.
रुग्णाच्या सेवेसाठी ओपीडी इमर्जन्सी सेवा सुरू ठेवली आहे.डोळ्याच्या रुग्णावर उपचार करताना एक फुटाच्या अंतरावरून करावे लागतात.यामुळे रुग्णसेवेसाठी खूप रिस्क घेऊन काम करावे लागते.आपण स्वतः मास्क वापरतो त्याच बरोबर रुग्णांना मास्क लावावा लागतो.दवाखान्यात सॅनिटायझर्स सुविधा उपलब्ध आहे.एका फुटावरून ऋग्नसेवा देताना एखादा रुग्ण शिंकला वा खोकला तर इन्फेक्शनमुळे कोरणाच्या संसर्गाचा धोका वाढतो.अशा सेवेत रुग्णाचे मोतीबिंदूतून काच बिंदूत गेलेल्या रुग्णावर रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया केली जाते असे डॉक्टर खडके यांनी सांगितले.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या लोकांनी डोळ्याच्या आजरा विषयीची तातडीची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यास संपर्क साधावा अशा रुग्णांवर अल्प दरात उपचार करण्यात येतील असे डॉ.आनंद खडके यांनी सांगितले.
0 Comments