Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी बाहेरून आलेल्यांनसाठी क्वारंटाईन केंद्र सुरु करण्याच्यासाठी अमर उपोषण



टेंभुर्णी बाहेरून आलेल्यांनसाठी क्वारंटाईन  केंद्र सुरु करण्याच्यासाठी अमर  उपोषण

टेंभुर्णी :[ प्रतिनिधी ]    - देशभरात कोरोणाच्या रूग्णात भर पडत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुंबई,पुणे आदी शहरातून येणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येक गावात क्वारंटाईन केंद्र सुरू करून बाहेर गावावरून आलेल्यांना सक्तीने क्वारंटाईन करावे या व अशा इतर मागण्यासाठी बशीर बाबासाहेब जहागीरदार यांनी आज सकाळी गुरुवार पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे. 
उपोषणा दरम्यान दिलेल्या  निवेदनात बशीर जहागीरदार यांनी म्हटले आहे की,सोलापूर शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असून आता ग्रामीण भागतरी वाचला पाहिजे ही आपल्या  सर्वांची जबाबदारी आहे.शासनाने आपापल्या गावाकडे जाण्यासाठी परवानगी दिल्याने मुंबई,पुणे सारख्या हॉटस्पॉट असलेल्या भागातून नागरिक आपल्या गावाकडे येत आहेत.अशा लोकांपैकी अनेकांच्या हातावर होम क्वारंटाईन केल्याचा शिक्का आहे.तर काहीजण तपासणी न करता बिनधास्तपणे गुपचूप आले आहेत.ते ग्रामीण भागात राजरोसपणे फिरत आहेत.लोकांत मिसळत आहेत.ही गंभीर बाब असून ग्रामीण भागासाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.
बाहेर गावाहून येणाऱ्यांची कुठेही नोंद ठेवली जात आहे.जिल्हा प्रशासनाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचे म्हटले आहे.याबाबत आरोग्य विभाग,महसूल विभाग व ग्रामपंचायत गंभीर नसल्याचेच समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर समाज हित समोर ठेवून प्रत्येक गावात होम क्वारंटाईन केंद्र सुरू करावे यासाठी सार्वजनिक सभागृह,मंगल कार्यालय,शाळा या ठिकाणी सोय करावी व तेथेच १५ दिवसाचा कालावधी पूर्ण करावा.ही जबाबदारी तहसीलदार,तलाठी,मंडल अधिकारी ग्रामसेवक,पोलीस पाटील,सरपंच यांच्यावर सोपविण्यात यावी असे म्हटले आहे.
या उपोषणास सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार,प्रहार औद्योगिक संघटनेचे पं. महा.प्रमुख अमोल जगदाळे,शिवसेनेचे प्रशांत सोनवणे,अनिल जगताप, RPI चे यशपाल लोंढे,रमेश लोंढे,गौतम कांबळे,विशाल खरात,विजय साळवे,भीमराव साळवे,अजित जहागीरदार,रणधीर जगताप,सनी खरात,रोहिदास पवार,पंपुरंग खरात,सुनील थोरात,निशांत खरात, दीपक गोंदिल,सागर जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


शिक्षकांना बाहेर काढा - जगदाळे
 सोलापुर जिल्ह्यातील  शिक्षकांना बाहेर काढून  गावातील सरपंच व पोलिस-पाटील व ग्रामसेवक यांच्या मदतीने प्रतेक गावात नविन आलेल्यांनची यादी काढने व होम क्वारंटाईन करने तसेच व त्यांना बाहेर शाळेत ठेवण्यासाठी  मदतकरणे हे जवाबदारी देण्याची मागणी प्रहार  औद्योगिक संघटणेचे पं महा. अध्यक्ष  अमोल जगदाळे यांनी मागणी केली आहे यांनी केली
Reactions

Post a Comment

0 Comments