अकलुज पोलीस ठाणेत खाजगी सावकारावर गुन्हा दाखल.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 12, 2020

अकलुज पोलीस ठाणेत खाजगी सावकारावर गुन्हा दाखल....

अकलुज पोलीस ठाणेत खाजगी सावकारावर गुन्हा दाखल....

 अकलूज( प्रतिनिधी )   स्वाती नामदेव बर्गे राहाणार चौङेश्वरवाडी मदानसिंह नगर अकलुज विधवा निराधार महीलेने सन २०१५ मध्ये खाजगी सावकार गोपाळ यशवंत सरगर राहाणार खुङुस यांच्याकडून दवाखान्याच्या उपचारा करीता १० रुपये शेकङ्या प्रमाने३ लाख रुपये घेतले होते.वरचेवर ७ लाख २०हजार रुपये व्याज दिले होते.वारंवार व्याज थकत असल्यामूळे व व्याजासह पैशे परत करतील असा विश्वास नसल्यामुळे गट.नं.११२/११ मधिल ०३ आर जागा,घर सावकाराने २०१७ रोजी दोन्ही मुल अज्ञान आस्ताना स्वाती बर्गे यांचेकडुन कब्जारहीत खरेदी घेतली.त्या नंतरही व्याज देत होत्या.२०१८ मध्ये दोन्ही मुल सुज्ञान झाल्यानंतर पुन्हा खरेदी घेतलीआणि पुन्हा व्याज चालु ठेवले.
      लॉक डाऊनच्या काळात व्याज थकल्यामुळ दि.१४-०४-२०२० सावकाराने व्याजाच्या पैशाखातर दमदाटी करुण संपूर्ण कुटुंबाला अंगाच्या कपङ्याशी घराबाहेर काढले आणि दि.४-५-२०२० रोजी व्याजाच्या पैशात घराचे कूलुप तोडुन
रातोरात १ लाख ५० हजार रुपयाच्या वस्तु सोने,पैशे सावकाराने आपल्या घरात ठेवल्या.
   घर, जागा बळकाऊण व्याजाच्या पैशाखातर घरातील सामान चौरी झाल्यामुळे अकलुज पोलीस स्टेशनला डिवायएसपी यांना दि.४-५-२०२० रोजी तक्रारी अर्ज दिले परंतु फीर्याद दाखल न केल्यामुळे भारतीय दलित महासंघाचे प.म.अध्यक्ष दादासाहेब लोखंङे यांच्याकङे गेल्या त्यांनी.आय ङी जी.एस.पी ङीवायएसपी.यांना ईमेद्वारे अर्ज केले. आणि न्याय मिळवून देण्याच्या हेतुने दि.६-५-२०२० रोजी अकलुज डि.वाय.ऐस.पी.कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या ङी.वाय ऐस.पी.यांनी ऐ.पी.आय.ऐमगर यांच्याकङे तपास दिल्या नंतर त्यांनी कसुन चौकशी केल्यानंतर सावकारीतुन खरेदि करुण व्याजाच्या पैशात सामान चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आंदोलनाच्या ५ दिवशी सावकार गोपाळ यशवंत सरगर आणी सचिन इंदुलिकर यांच्यावर कलम३८०,३४,३९,४५  प्रमाणे सावकारी आणि चोरीच्या गुन्ह्याची फीर्याद दाखल करुण घेतली.आणि तात्काळ अटक करण्यात आली.
        फीर्यादि स्वाती बर्गे ह्या विधवा निराधार आसल्याने व त्यांच्या पाठीशी कुनाचा आधार नसल्याने भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब लोखंङे यांनी न्याय मिळवुन दिल्याने फीर्यादी स्वाती बर्गे यांनी त्यांचे व पत्रकार बांधवाचे आभार मानले. माळशिरस ता.अध्यक्ष आकाशभैया लोखंङे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages