विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक १४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2020

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक १४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक
१४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल


मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली.


विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे.


  संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.)रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.),  उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना) शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी). राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.), राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष)
यापूर्वी दि. ८ मे रोजी चार उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.) प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.) रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भा.ज.पा.)डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा) यांचा समावेश आहे.
नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. १२ मे रोजी होणार असून नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत दि. १४ मे २०२० आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages