त्या' बारा जणांचे कोरोना टेस्ट नमुने पुढील तपासणीसाठी पाठविले ; तर घेरडी येथील त्या संशयिताना मिळाला 'डिस्चार्ज
सांगोला (जगन्नाथ साठे) काल सोनंद येथील लक्ष्मीनगर (लक्ष्मीवाडी) येथे सोलापूर रहिवास असलेला एक पोलीस कर्मचारी करोना बाधित आढळलेला होता,या घटनेने संपूर्ण तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने काल त्याच्या जास्त संपर्कात आलेल्या बारा व्यक्तींना मेडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे .तर जास्त संपर्कात असलेल्या परंतु सोलापूर येथील रहिवासी असणाऱ्या तीन जणांना पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी सोलापूरला पाठविले आहे . प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे आज बारा जणांचे कोरोना टेस्टसाठी नमुने घेण्यात आले असून हे नमुने सोलापूरला पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.हे नमुने अहवाल प्राप्त होईपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.सदर प्रतिबंधित क्षेत्रातील एकूण 67 कुटुंबांतील 336 लोकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बाधित अथवा संशयित रुग्ण आढळला नसल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. तर मौजे घेरडी येथे आढळलेल्या संशयित रुग्णाचा ज्या लोकांसोबत संपर्क आला होता व ज्यांच्या निगेटिव्ह टेस्ट आलेल्या होत्या अशा सर्व संशयितांना सोलापूर येथून डिस्चार्ज दिला असून त्यांना वैद्यकीय निगराणी मध्ये सांगोला महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या कोवीड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे.
सोनंद आणि परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर न विश्वास ठेवता, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,अत्यावश्यक कामानिमित्तच बाहेर पडा, सोशल डिस्टन्स ठेवा,असे आवाहन ही आपत्ती व्यवस्थापन चे प्रमुख उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
0 Comments