सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 3333 नागरिकांना परवानगी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 14, 2020

सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 3333 नागरिकांना परवानगी

सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 3333 नागरिकांना परवानगी



 सोलापूर दि. 14 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 54 नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 3279 नागरिकांना अशी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी  3333 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.
राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे.
एक मे पासून covid19.mhpolice.in या वेबसाईट आजपर्यंत 35086 अर्ज प्राप्त  झाले असून 20506 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 2575 अर्जांना परवानगी नाकारली असून 12005अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. तर काही अर्ज इतर जिल्ह्यातून/राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने  प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तात्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण  16403 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी 12338 जणांना परवानगी दिली आहे तर 4065 जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages